Army Bharti 2023: लष्कराच्या भरतीसाठी आता लागणार ‘CEE’जाणून घ्या काय आहे सविस्तर माहिती..!!

By Noukarisamachar

Published on:

Army bharti

Army Bharti 2023 नमस्कार मित्रांनो भारतीय लष्कराने JCO, OR च्या भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.

पहिल्या टप्प्यात joinIndianarmy.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज केलेल्या उमेदवारांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची  ARO ने ठरवलेले ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी आणि मोजमाप चाचणी घेतली जाईल.

शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची रॅलीच्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. अशी माहिती लष्करा तर्फे देण्यात आलेली आहे.

ऑनलाइन CEE चाचणीला बसण्यासाठीची प्रवेश पत्रे परीक्षा सुरू होण्याच्या 10 ते 14 दिवस आधी जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवर उपलब्ध असतील.

आणि परीक्षेची सूचना उमेदवारांच्या मोबाईलवर SMS द्वारे आणि त्यांच्या नोंदणीकृत email ID वर पाठवली जाईल.

मित्रांनो, ही परीक्षा संगणकावर आधारित आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करणारे विषयावरील व्हिडिओ जॉईन इंडियन आर्मी वेबसाईटवर आणि युट्युब वर देखील उपलब्ध आहेत.

ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE)

ऑनलाइन CEE ही संगणकावर आधारित परीक्षा आहे. परीक्षेला बसण्याची प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ आहे.

उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन प्रवेश परीक्षेला कसे बसावे’या विषयावरील व्हिडिओ जॉईन इंडियन आर्मी वेबसाईटवर आणि युट्युब वर देखील.

या परीक्षेचा अभ्यासक्रमात आणि पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन CEE ची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी सर्व विषयाच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आले आहेत.

Army Bharti 2023

आणि जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवर एक लिंक देण्यात आली आहे. अशाप्रकारे उमेदवार घरबसल्या या परीक्षेचा सराव करून शकतात.

सराव चाचणी मध्ये प्रवेश केल्यावर उमेदवारांना संगणकावर ती स्क्रीन पाहता येईल जी त्यांना प्रत्यक्ष परीक्षा दरम्यान दिसेल. या सराव चाचण्या मोबाईलवर देखील पाहता येतात.

भरती रॅली

ऑनलाइन CEE मधील कामगिरीच्या आधारावर, निवड झालेल्या उमेदवारांना भरती रॅलीसाठी नामनिर्देशित ठिकाणी बोलावले जाईल.

भरती मेळाव्याची पद्धत कायम आहे. अंतिम गुणवत्ता ऑनलाईन CEE निकाल आणि शारीरिक चाचणीच्या मनावर आधारित असेल.

मदत कक्ष

उमेदवारांच्या कोणत्याही शंकाचे स्पष्टीकरण देण्यासाठी, एक हे मदत कशी देखील स्थापन करण्यात आला आहे, ज्याच्या तपशील जॉईन इंडियन आर्मी वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन CEE संबंधित प्रश्नासाठी, मोबाईल क्रमांक 7996157222. ह्या नंबर वर देखील स्पष्टीकरण उपलब्ध आहे.

फायदे

बदललेली कार्यपद्धती भरती दरम्यान अधिक बौद्धिक पैलूवर लक्ष केंद्रित करेल आणि परिणामी देशभरात व्यापक स्तरावर पोहोचेल.

यामुळे भरती रॅलीमध्ये जमणारी मोठी गर्दी कमी होईल आणि त्याचे जास्त प्रशासकीय अवस्था लागणार नाही.

ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थेत, उमेदवारांसाठी सोपी होईल आणि देशांच्या सध्याचे तांत्रिक प्रगतीशी सुसंगत असेल.

पेपर फुटीला आळा

उमेदवारांच्या लक्ष देईल की, ही परीक्षा कमीत कमी मानवी हस्ताक्षपाद्वारे पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आले आहे.

उमेदवारांनी पेपर फुटी करणाऱ्यांना बळी पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे, कारण ते त्यांना कोणतेही प्रकारे मदत करू शकत नाहीत.

भरती प्रक्रिया पूर्णपणे निपक्षपाती निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित आहे.

 

नलाईन नोंदणी कशी करायची हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

ऑनलाइन फॉर्म गव्हर्मेंट वेबसाईटवर भरण्यासाठी येथे क्लिक करा.

Army bharti
Army bharti

 

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas