Hawamaan Andaaz नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुंबई सह राज्याच्या हवामान खात्यात सातत्याने बदल होत असल्याचा दिसून येत आहे.
राज्यामध्ये 8 मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ हवामान राहून विजांच्या लखलखातासह आणि ढगांच्या गडगडाटा सह पावसाची दाट शक्यता आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, आणि फळबागा यांसारख्या अनेक पिकांचे चांगल्या प्रकारे संगोपन करणे आहे महत्त्वाचे.
नाहीतर हातात तोंडाला आलेले पीक हा अवकाळी पाऊस हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे कशाही प्रकारची हानी न होणार याची शेतकरी बांधवांनी काळजी घेतली पाहिजे.
तर सात मार्च रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची दाट शक्यता.
मुंबईच्या कमाल तापमानात मोठी स्थित्यंतरे होत असून, 35 अंशावर असणारे कमाल तापमान थेट 37 अंशावर जाऊन पोहोचले गेले आहे.
Hawamaan Andaaz
त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात काही ठिकाणी पाऊस तर मुंबईत जीवघेणा उकाडा म्हणजेच खूप गर्मी असे विचित्र वातावरण तयार झालेले आहे.
मुंबईमध्ये जागोजागी मोठ मोठ्या बिल्डिंग असल्या कारणाने आणि ऊन जोराचे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्मी देखील होत आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट वीज पडून तीन बैल जागीच ठार.
धुळे/ जळगाव जिल्ह्यात शनिवारी रात्री शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे.
यादरम्यान गारपीट होत असताना वीज पडून सांगवी मंडळात एक तर शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला.
पळस्नेर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जळगावच्याही काही भागात शनिवारी रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला.
या जिल्ह्यांना पावसाचा आणि गारपिटीचा इशारा..!!
कोणते जिल्हे आहेत पहा.