How to take care of hills in winter season पायांना पडल्यात भेगा, थंडीत होतोय त्रास, जाणून घ्या या चार टिप्स. टाचांना मिळेल आराम

By Noukarisamachar

Published on:

How to take care of hills in winter season थंडीच्या दिवसांत प्रामुख्याने टाचा फाटने ही खूपच मोठी समस्या आहे. यामुळे खूपच त्रास होतो चालणे फिरणे बंद होते. आरोग्याच्या दृषटिकोनातून टाचाना भेगा पडणे म्हणजे खूपच त्रासदायक दुखणे आहे. रोजच्या धावपळीच्या कामामुळे आपण या गोष्टीकडे  दुर्लक्ष करून बसतो आणि त्या भेगांमध्ये घान जाऊन बसते त्यामुळे भेगा वाढत जातात आणि त्यामधून रक्तस्त्राव होतो आणि पू बाहेर येतो. अश्या वेळी आपण काय करावे जेणेकरून हे टाचांचे दुखणे वाढणार नाही आणि तुम्हालाही चार चौघात लाजिरवाणी गोष्ट वाटणार नाही त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे हे खाली संपूर्ण सांगितले आहे.( How to take care of hills in winter season )

* चार उपाय खालीलप्रमाणे

१. रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा तास पाय भिजवून घ्यावे जेणेकरून पायांचा कोरडेपणा कमी होईल आणि जखमेतून घान बाहेर येईल. यानंतर पाय स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे आणि त्या वर थोडे मॉइश्चरायझर लावून विश्रांती घ्यावी. पाय नरम झाल्यामुळे भेगावर जोर पडून रक्त येणार नाही.

२. खोबऱ्याचे तेल हे खूपच गुणकारी औषध आहे. प्राचीन काळापासून भारतीय आयुर्वेदात खोबरं तेल महत्त्वाचे औषध मानले आहे. भेगांवर थोडे खोबरं तेल मालिश करावी जेणेकरून पायांना नरम पणा येईल आणि चालताना पायांवर जोर पडून भेगांमधून रक्त नाहीं. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा यामुळे पाय गुळगुळीत राहण्यास मदत होते. याचबरोबर बदाम तेल आणि तिळाचे तेल पण तुम्ही वापरू शकता.

३. टाचांच्या भेगा कमी न होण्याचे मूळ कारण म्हणजे भेगांमध्ये जमा होणारी घान आणि मळ. हा मळ रोजच्या रोज साफ करायला पाहिजे या साठी बाजारात खडबडीत दगड भेटतात आणि काही विशेषत प्रकारचे ब्रश सुधा भेटतात त्यांचा वापर करावा.

४. टाचांचे एक्सफोलिएशन करणे ही खूप महत्वाचे आहे यासाठी साखर, मध, कॉफी आणि कोरपडीचा याने भेगा साफ करून घ्यायला पाहिजे यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि दुसरी त्वचा येण्यास मदत होते.पाय साफ आणि गुळगुळीत दिसतात.

Today Gold Price सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.. थेट सोन्याच्या भावात 4 हजार रुपयाने घट..

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas