Mansoon Update today
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी जुलै महिना संपते पर्यंत पाऊस चालूच राहणार आहे असे हवामान अंदाज पंजाब यांनी कालच्या बैठकीत सांगितलं आहे.
महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची हजेरी लागली. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर राज्यातील बहुतांशी भागात जून महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. जून महिन्यात एक ते 21 जून दरम्यान मात्र 11.5 टक्के एवढा पाऊस पडला होता.
कांदाचाळ अनुदान आता कांदाचाळसाठी 1 लाख 60 हजार रुपये अनुदान ; अर्ज सुरू एथे करा ऑनलाइन अर्ज
हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. डख यांनी राज्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
जूनपेक्षा जुलै महिन्यात अधिक पाऊस राहणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
तसेच जुलै पेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात अधिक पाऊस राहील असे देखील त्यांनी सांगितले.
त्यांनी महाराष्ट्रात आता 8 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार असे भाकीत वर्तवले असून या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच ज्या भागात आठ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही त्या भागात 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान जोरदार पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आठ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून भाग बदलत पाऊस होणार आहे.
तसेच 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान देखील राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
IMD ची अचूक अशी माहिती.पुढील 3 दिवसात या भागात जोरदार पाऊस आणि या गारपिटीचा इशारा..!
कोणत्या भागात पडणार पाऊस?
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आता पाऊस पडणार आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आधीपासूनच पाऊस सुरू आहे. आता राज्यातील उर्वरित भागात देखील पाऊस होणार असा अंदाज आहे. Mansoon Update today