New Highway in Maharashtra
भारतात ज्याप्रमाणे नदीला महत्व आहे त्याचप्रमाणे हायवेला सुद्धा तेच महत्त्व आहे.
ज्या भागातून नदी जाते त्याच भागात भरपूर जास्त प्रमाणात विकास होतो तेथील लोकांना शेती करण्यासाठी पाणी
तसेच उद्योग धंदे करण्यासाठी पाणी त्यांचे जीवन सुरळीत होते त्याचप्रमाणे ज्या भागातून येथील लोकांचा विकास होत जातो.
हायवे मुळे तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव येतो व रोडच्या शेजारी धंदा ही करू शकतो त्यामुळे रोडला विशेष महत्त्व आहे.
तर मग आत्ताच आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत निवडणुका नंतर महाराष्ट्रात कोणकोणत्या नवीन तीन महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे
व कोण कोणत्या शहराला हे नवीन होणारे महामार्ग जोडणार आहेत त्यामुळे प्रवासाचे किती घंटे वाचणार आहोत हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
किती किती km चे असणार आहेत हे नवीन महामार्ग.
कोणतेही काम करायचे असले तर सरकार एक कंपनी निवडत असते.
जसे की तुम्हाला माहीतच आहे आत्ता होणाऱ्या सर्व एक्झाम TCS व IBPS कंपनी मार्फत घेतल्या जातात.
महाराष्ट्राचे रस्ते विभागाचे डिपार्टमेंट MSRDC या डिपार्टमेंट कडे काही दिवसापूर्वीच हे तीन नवीन महामार्ग बनवण्यासाठी 42 निविदा आल्याची माहिती दोन-तीन दिवसापूर्वी लोकसत्ता या वृत्तपत्रात दिली गेले.
New Highway in Maharashtra
या नवीन महामार्गाचे कोणकोणत्या दोन शहराला जोडणार आहेत त्याचे नावे खालील प्रमाणे
1) विरार – अलिबाग
2) पुणे वर्तुळाकार महामार्ग
3) नांदेड जालना दूतगती महामार्ग
हे तीन नवीन महामार्गाचे नावे आहेत.
या प्रकल्पासाठी 18 कंपन्यांनी 3 प्रकल्पातील 26 टप्प्यासाठी 82 निवेदिका सादर केले आहेत या सादर केलेल्या निवेदिका मध्ये उच्च दर्जाच्या कंपन्या असल्याची बोलले जात आहे.
आता या निवेदिकाची छाननी करून अंतिम टप्प्यात येणार आहेत.
आचारसहिता संपुष्टात आल्यावर म्हणजेच जूनमध्ये निवेद्यकाची अंतिम छाननी होईल.
मुंबई महा नगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व विरार अलिबाग ते अंतर कमीत कमी वेळात पार करता यावे यासाठी विरार अलिबाग महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
या बहुउद्देशीय महामार्गाची एकूण लांबी 128 किमी असणार आहे.
तर समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर महामार्गाचा विस्तार करून तो जालना ते नांदेड करण्याचा MSRDC निर्णय घेतला आहे
या महामार्गाची लांबी 190 किमी असणार आहे हा समृद्धी महामार्गाचा विस्तारलेला भाग असणार आहे.
व पुणे या शहरा तील ट्राफिक कमी करण्यासाठी पुणे रिंग रोड म्हणजेच वर्तुळाकार महामार्ग तयार करण्यात येणार आहे या महामार्गाची लांबी 136 किमी असणार आहे.
या तीनही प्रकल्पासाठी फक्त 30% जमीन अधिग्रहण केले असून उर्वरित जमीन 70 टक्के जमीन निवडणूक नंतरच अधिग्रहण केली जाईल.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.