Talathi Bharti 2023 अखेर तलाठी भरतीची ओरिजिनल जाहिरात प्रसिद्ध, इथे पहा PDF जाहिरात..

By Noukarisamachar

Published on:

Talathi Bharti 2023 | नमस्कार मित्रांनो महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे ग्रामीण पातळीवरील तलाठी हे महत्त्वाचे पद आहे. नव्हतीच तलाठी भरती करता ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून राज्यात 4644 तलाठी पदांची महाभरती करण्यात येणार आहे.

ग्रामीण पातळीवरील शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदवही सांभाळणे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी विषयी माहिती अद्यावत करणे आणि ती माहिती शासनास पुरवणे हे तलाठ्याचे प्रमुख काम आहे त्यामुळे ग्रामीण पातळीवर तलाठ्याला मोठा मान असतो. तलाठी भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. गेल्या नऊ-दहा वर्षापासून तलाठी भरती झालीच नाही. अशा कोरोना काळात कोणती भरती झाले नसल्याने तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता ही एक सुवर्णसंधी आहे.

♦Best Cources after 10th तुम्ही नुकतेच दहावी पूर्ण केले आहे आणि पुढे काय असा विचार करत आहात ? तर मग नक्की वाचा 

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून तलाठी भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक, मूळ जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागणार याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

तलाठी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Talathi Bharti 2023 : महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

✍ पद : तलाठी

✍ पदसंख्या : एकूण 4644  जागा

✍ वेतन श्रेणी : एस-८ रु. 25,500-81,100/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ जुलै २०२३

Talathi Bharti 2023 : ऑफिसियल वेबसाइट इथे क्लिक करा.

 

Talathi Bharti 2023 : संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

 

तलाठी भरती 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas