Weather Update नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले सर्वांचे परिचित असणारे पंजाबराव साहेब यांनी नुकताच तातडीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात 25 एप्रिल पासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे.
काही भागात गारपीट देखील होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी याची दखल घेऊन आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी. जेणेकरून आपले कमीत कमी नुकसान होईल. यावर्षी निसर्ग राजा बळीराजावर कोपला आहे, एप्रिल महिना संपत आला आहे परंतु राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस याचे सत्र चालूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक भागात गारपटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेले द्राक्ष बाग अक्षरशा कोलमडून गेले आहेत यातून बळीराजाचे लाखो रुपयाांचे नुकसान झाले.
Weather Update अवकाळीचा जोर कायम…!!
अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने अवकाळी पाऊस थैमान माजवत आहे.
Onion price अवकाळी मुळे कांदा खराब ; जून महिन्यात वाढणार कांद्याचे बाजार भाव
पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस :-
वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज ता. 26 एप्रिल 2023 रोजी पुढील भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील :- नाशिक, नगर, पुणे, सातारा.
मराठवाड्यातील :- छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, जालना. परभणी.
विदर्भातील :- बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, नगर,पुणे, सातारा,अमरावती,बुलढाणा जालना, धाराशिव, परभणी या भागात गारपीट होऊ शकते असा अंदाजा पंजाबराव डक यांनी दिलेला आहे..
नुकताच जाहीर केलेल्या अंदाजानुसार पंजाबराव डक अंदाज खरा ठरला आहे काल या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले :-
नांदेड :
– नायगाव, लोहा तालुक्यात पावसाचे आगमन
– पोखरणी कृषी विज्ञान केंद्र परिसरात गारपीट
हिंगोली :
– डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथे गारपीट, केळी बागांचे मोठे नुकसान.
– वारंगा फाटा परिसरात गारपीट, जोरदार पाऊस.
जालना :
– कुंभार पिंपळगाव येथे विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात
– घनसावंगी विजेचा कडकडाट वादळ वारे, हलक्या पावसाच्या सरी
– तिर्थपुरी येथे विजेचा कडकडाट वादळ वाऱ्यासह पाऊस.
मोदी सरकार महिलांना देत आहे 06 हजार रुपये लाभ पहा तुम्हाला भेटेल का…?? येथे करा अर्ज..
