7 /12 Update करा अशाप्रकारे आणि पिकाची नोंदणी करा याप्रकारे..!!

ई-पिक पाहणी मोबाईल ॲप.

यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ए पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअरमधून सहज घेता येणे शक्य आहे.

या ॲपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व देण्यात आले आहे. आजच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकणार आहेत , शिवाय पिकाचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी यांच्या लॉगिन वर उपलब्ध होणार आहे त्याला तलाठी यांनी मान्यता देत असताना शेतकऱ्यांच्या 7/12 वर तात्काळ होणार आहे.

अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली.

 

ई पिक पाहणी अँप वरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद केल्यास अचूक व गतीने माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे.

या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पिक कर्ज , पिक विमा, कर्जमुक्ती ,नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे.