काय आहे या योजनेचा उद्देश? पहा सविस्तर माहिती..!!
भारत अनुसूचित जाती व नाव बंद प्रवर्गातील जे विद्यार्थी स्वतःचे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी एकाचे घर सोडून दुसऱ्या शहरात त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्फत आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे तसेच त्यांचे दैनंदिन जीवनातील इतर खर्चही थोड्याफार प्रमाणात मदत करता यावी हा या योजनेचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहायची आवश्यकता भासू नये. शिवाय कोणाकडून जास्त व्याजदर आणि कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वावलंबी बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेमागचा उद्देश असल्याचेही सांगण्यात आलेले आहे.