Aaple sarkar Kendra नमस्कार मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र नागपूर या जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सुरू झाले आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत
तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र मार्फत विविध योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो.
जसे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा डोमासाईल प्रमाणपत्र तसेच जातीचा दाखला जवळजवळ 200 पेक्षा जास्त सर्विस चा लाभ या आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू कार्यालयामार्फत देण्यात येतो.
नागपूर ह्या जिल्ह्याकरिता नवीन आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी जाहिरात निघालेली आहे.
दिनांक 6 मार्च ते 31 मार्च या वेळेमध्ये आपण अर्ज करून नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आपले सेवा केंद्र चालू करू शकता.
आपले सरकार सेवा केंद्र बद्दल संपूर्ण माहिती सुरळीतपणे पाहुयात.
जिल्हाधिकार्यालय नागपूर तसेच जिल्हा सेतू समिती यांच्यामार्फत आपले सरकार सेवा केंद्र याकरिता नागपूर जिल्ह्यासाठी,
शहरी आणि ग्रामीण भागातील यासाठी सध्या कार्यरत असलेल्या एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र म्हणजे सेतू केंद्र.
तसेच महा-इ-सेवा केंद्र यांच्यासाठी जिल्हाधिकार्यालय यांच्यामार्फत एक नवीन जाहिरात प्रकाशित केली गेली आहे.
19 जानेवारी 2018 रोजी च्या शासन नियमानुसार शहरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त पदाची यादी नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
Aaple sarkar Kendra
नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील 33 केंद्रासाठी तसेच शहरी भागातील 108 केंद्रासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
तसेच शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील कोणत्या गावासाठी आपले सेवा केंद्र देण्यात येणार आहे.
यासंबंधी सविस्तर माहिती आपल्याला नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेलच.
आणि आपण याची लिंक खाली शेवटी पण दिलेली आहे तुम्ही ही संपूर्ण माहिती तुमच्या घरबसल्या पाहू शकता त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहा.
नागपूर जिल्ह्यामधील CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर धारकांना व जिल्ह्यामधील शहरी व ग्रामीण भागातील भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यांचे केंद्र सुरू असेल.
परंतु जो CSC कॉमन सर्विस सेंटर चे केंद्र मिळवण्यासाठी विविध नमुन्यात अर्जातील अटी व नियम पाहून अर्ज करीत असेल.
तर अशा व्यक्तींना सहा मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी व अचूक असा अर्ज सादर करू शकतो.
मित्रांनो आपले सरकार ज्या व्यक्तींना स्वतः जिल्हाधिकार्यालय नागपूर येथे स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे.
आणि अर्ज करताना आपली पोहोच पावती घेण्यास विसरू नये ईमेल द्वारे अथवा आवक जाऊ विभागाद्वारे इतर पद्धतीने अर्ज केला तर तो अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
तसेच दिलेल्या तारखे मध्येच हार्ड सादर करावा असे आव्हान करण्यात आलेले आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी काही नियम व अटी पहा तर कोणते आहेत नियम व अटी.
अर्ज सादर करणारे उमेदवाराकडे संगणक ज्ञान म्हणजेच MSCIT किंवा ट्रिपल सी हे प्रमाणपत्र असणे आहे महत्त्वाचे.
सीसी आय डी असणाऱ्या कॉमन सर्विस सेंटर धारकांना अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येईल.
कॉमन सर्विस सेंटर (CSC) धारकांनी एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास केंद्रातील मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या केंद्र चालकाचे अधिक व्यवहार झाले असतील.
अशा कॉमन सर्विस सेंटर CSC सेवा केंद्रांना दर्जा प्राप्तीसाठी चालकाचे व्यवहार सन्मान असल्यास सोडचिट्टीद्वारे पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
या विषयी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय शेवटचा राहील.
इतर अटी व शर्ती पाहण्यासाठी खालील दिलेल्य लिंक वर जा.