CEE कशी करायची??

जॉईन इंडियन आर्मी च्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी 16 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत सुरू आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. उमेदवार आधार कार्ड अथवा दहावीचे प्रमाणपत्र वापर करून नोंदणी करू शकतात. ऑनलाइन CEE देशभरातील 176 ठिकाणी आयोजित केली जात आहे. यामध्ये उमेदवारांना पाच परीक्षा केंद्र निवडायचे पर्याय आहेत. आणि त्यांना त्यांच्या पर्यायांपैकी एक परीक्षा केंद्र दिले जाईल. ऑनलाइन CEE साठी प्रति उमेदवार 500 रुपये शुल्क आहे. शुल्काचा 50 टक्के वाटा लष्करांकडून उचलला जाणार आहे. नोंदणी प्रक्रियेच्या शेवटी उमेदवारांना पेमेंट पोर्टलवर निश्चित केले जाईल. उमेदवाराने इंटरनेट बँकिंग यु पी आय किंवा कार्डद्वारे 250 रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे.