Land Record
शेतकरी मित्रांनो आज आपण सर्व शेतकरी बांधवांना आता स्वतःच्या मोबाईल वरती ऑनलाईन पद्धतीने 1880 पासून चे संपूर्ण शेतीमधील जमिनीचे उतारे आपण कशाप्रकारे पाहायचे हे संपूर्णपणे माहिती या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
मित्रांनो आपल्याला जमीन खरेदी किंवा विक्री करायचे असल्यास आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वात अगोदर जमिनीचा पूर्ण इतिहास माहिती असायला हवा असतो.
तर मित्रांनो हा इतिहास म्हणजे नेमकं काय तुम्हीही विचारात पडला असता तो इतिहास कशाप्रकारे आपल्या मोबाईल वरती पाहायचा ते आपण आज सविस्तर पाहणार आहोत.
तर मित्रांनो इतिहास म्हणजे सर्वात पहिले शेती कोणाच्या नावावर ती होती आणि आता कोणाच्या नावावरती आहे.
ही शेती संपूर्ण किती आहे आणि ह्या शेती विकण्याच्या मागचा उद्देश काय आहे ही संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
आता ही माहिती नेमकी असते कुठे तर मित्रांनो ही माहिती तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा भूमिलेख सातबारा उतारा पत्रिकेमध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली असते.
तर आता ही माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती देण्याचे ठरवले आहे म्हणजेच शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची धावपळ करायची गरज नाही.
कोणत्या कार्यालयामध्येही जाण्याची गरज नाही यासाठी शासनाने एक चांगली योजना हाती घेतली आहे ती म्हणजे आता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती आपल्याला 1880 पासूनचे संपूर्ण शेतीचा आराखडा पाहता येणार आहे.
आता शासन फेरफार आणि शेतीचा उतारा हे मोबाईलवर किंवा संगणकावर उपलब्ध करून दिलेले आहे तर हे खूप शेतकऱ्यांना पाहता येत नाही हे आपण आज सविस्तर कशाप्रकारे पाहायचे पाहणार आहोत.
जुने सातबारे आणि फेरफार पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता. Land Record