Land Records on web नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये पिकाची नोंदणी कशाप्रकारे करायची आणि आपल्या शेताचा 7/12 पाहायचा कसा हे आपण पाहणार आहोत.
शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने “ई पिक पाहणी’ हे मोबाईल वरील एप्लीकेशन विकसित केले आहे.
याचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची नोंद 7/12 करू शकणार आहेत.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते.
सध्या स्थितीत गाव नमुना 7/12 वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते.
आता शेतकरीच आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पिकाची नोंद करू शकणार आहेत.
पिक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होईल असा विश्वास अमरावतीच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
Land Records on web
असा पहा तुमच्या शेताचा 7/12 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
विविध विभागांकडून अनेक योजना व कामांमध्ये अद्यावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासन प्रयत्न करत असते.
त्यानुसार शासन “ई पीक पाहणी’जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्यास निर्णय घेतला आहे.
त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
आता शेतकरी बांधवांना पहिल्यासारखे तलाठ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही.
तलाठ्यांकडील वाढत जाणारा कामाचा बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक एखादी महत्त्वाचे काम करावे लागणे.
यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदी घेणे यामध्ये विलंब लागू शकतो.
त्यामुळे पीक नोंदीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्यांना करायची असतात, त्यामध्ये शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होतो.
या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई पीक पाहणी” जलद ,वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे, महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे चे यांनी दिली.
आता शेतकरी बांधवांना काळजी करायची काहीच गरज नाही पहा आपल्याच मोबाईलवर ई – पिक पाहनी.