Mp land Record :- वारस हक्काची नोंदणी ऑनलाईन कशी करावी ..?? आता घरबसल्या ऑनलाईन करा वारसाची नोंदणी 2 मिनिटांत..!

By Noukarisamachar

Published on:

Land record नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वारस हक्काची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे घरबसल्या करायची याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Registration of Inheritance Rights Online. Mp Land record

आपल्यापैकी बऱ्याच लोकांची जमीन ही वडिलांच्या किंवा आईच्या नावावर असते आई-वडील यापैकी ज्याच्या नावावर जमीन आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ही जमीन त्यांच्या वारसांना मिळत असते.

परंतु हल्ली आपल्याकडे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर  जमिनीच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात भांडणे होताना आपण पाहत आहोत कारण वारस हक्काचे नोंदणी नसल्यावर भावाभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होतात.

महाराष्ट्र सरकारने या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज द्वारे सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे.  शेतकऱ्याच्या नावामध्ये दुरुस्ती करणे, वासाची नोंद करणे किंवा जमिनीची संबंधित विविध करार करणे असे वेगवेगळे कामे करू शकतात. चला तर मग पाहूया ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे वारस हक्काचे नोंदणी करावी.

महाराष्ट्र शासनाचे ऑनलाइन नोंदणी प्रणाली ऑनलाईन प्रणाली

वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Registration of Inheritance Rights Online एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना वारसा हककां प्रमाण जमीन मिळते परंतु यासाठी वारसाची नोंद असणे गरजेचे आहे. शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही.

तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता.

हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

kharip pik vima 2022 ; चांगली बातमी..! उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटप या 16 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार, पहा तालुकानिहाय यादी

Mp land Record महाराष्ट्र शासनाची ई-हक्क प्रणाली :-  

  • ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं. 

Registration of Inheritance Rights Online :-

Mp land Record
Mp land Record

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? 

  • हा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर पब्लिक डेटा एन्ट्री नावानं एक पेज ओपन होईल.
  • यावरील Proceed to login या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला नवीन युजर ची नोंदणी करावी लागणार आहे.
  • दिल्ली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून आपला मोबाईल नंबर युजर आयडी टाकून नवीन युजर ची नोंदणी करावी. New User registration. 

User Registration झाल्यानंतर अशा पद्धतीने करा वारस हक्काचे नोंदणी :-

Mp land Record
Mp land Record
  1. तुम्ही व्यवस्थित रित्या युजर रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन या पर्यायावरती क्लिक करा.
  2. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून व्यवस्थित रित्या लॉगिन करा.
  3. त्यानंतर Details नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथे तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  4. यातल्या 7/12 mutations वर क्लिक करायचं आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर User is Citizen आणि बँकेचे कर्मचारी असाल तर User is Bank या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  6. एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर Process या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  7. त्यानंतर तुमच्यासमोर फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क नावाचे पेज ओपन होईल.
  8. इथे सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.
  9. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा, असा मेसेज तुम्हाला दिसेल.
  10. आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण वारस नोंद हा पर्याय निवडायचा आहे.
  11. त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  12. त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसूदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ओके बटनावर क्लिक करायचं आहे.Mp land Record

ऑनलाइन नोंदणीसाठी कोणती माहिती लागते..?

  • ऑनलाइन नोंदणी करतेवेळी तुम्हाला मयताचे नाव आणि मृत्यू झाल्याचा दिनांक.
  • तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक.
  • सर्व वारसांची अचूक नावे.
  • गट क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार क्रमांक.
  • अर्जदार व्यक्तीचा संपूर्ण पत्ता. पिन कोड सह

Mp land Record ऑनलाइन नोंदणीसाठी कोणते कागदपत्र लागतात..?

  1. मृत्यू झालेले व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.
  2. स्वयंघोषणा पत्र.
  3. हमीपत्र, शपथ पत्र.
  4. आधार कार्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी.
  5. अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत. – अशा आशयाचं हे पत्र असतं.
  6. सगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठाचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल.
  7. त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात.Mp land Record

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas