Onion Market
नमस्कार शेतकरी बांधवांनो संपूर्ण कांदा उत्पादन शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय 40 रुपये प्रति किलो एवढा बाजार भाव पहा कोणती आहे ती बाजार समिती.
थोडसं पण महत्त्वाचं..
अवकाळी पावसामुळे आगमन लांबलेला गावरान कांदा आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर चांगलाच भाव खात आहे. स्थानिक बाजार समितीत गावरान कांद्याला २४०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात हा कांदा चाळीस रुपये किलोने विकला जात आहे.
कांद्याचे दर वधारल्याने आतापर्यंत साठवून ठेवलेला कांदा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजारात आणला आहे.
विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात गावरान कांद्याचे (उन्हाळ) पीक घेतले जाते. साधारणतः मे महिन्यात या कांद्याचे बाजारात आगमन होते.
यंदा मात्र अवकाळी पावसाने या कांद्याचे नुकसान केल्याने व प्रतवारीसह उत्पादनाची सरासरी घसरली आहे. बाजारात नाशिक आणि गुजरातमधून आलेला कांदा मुबलक होता.
मात्र तो नाशवंत असल्याने त्याचा साठा ग्राहक करू शकत नसल्याने त्याला गरजेपुरताच उठाव होता.
स्थानिक बाजारपेठेत रविवारी (ता. २५) गावरान कांद्याला १००० ते २४०० रुपये भाव मिळाला. ३७० क्विंटल कांद्याची आवक नोंदविण्यात आली. भाव वधारल्याने आता आवकही वाढण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारात गावरान कांदा ३० रुपये किलोने विकला जात असून तोच कांदा इतवाऱ्यातील भाजीबाजारात ३५ रुपये व किरकोळ विक्रेत्यांकडे ४० रुपये किलोने विकला जात आहे.Onion Market
Soybean Rate Today :- आज सोयाबीनच्या बाजार भाव मध्ये चांगलीच वाढ..26/06/2023
गावरान कांद्याचे दर (प्रति किलो)
शेतकरी : २४ रुपये
घाऊक बाजारातील व्यापारी : ३० रुपये
भाजीबाजार (इतवारा) : ३५ रुपये
किरकोळ विक्रेता : ४० रुपये
दररोजच्या लाईव्ह कांद्याचे बाजार भाव पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा..