Rain alert
नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच म्हणजे 21 जुलै 2023 या दिवशी अमरावतीसह आणखी दोन जिल्ह्यांमध्ये भयानक अशी ढगफुटी झालेली आहे
त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या कुठल्याही प्रकारचे पीक असे सुरळीत म्हणजे चांगले राहिलेले नाही त्यावर शासन काय निर्णय घेणार आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती आणि तो ढगफुटीचा व्हिडिओ पाहुयात..
थोडंच पण महत्त्वाचं..
अमरावती जिल्ह्यात (Amravati Rain) गुरुवारी दुपारी काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा शेत शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीत पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत.
काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आता सरकारकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी यावेळी केली जात आहे.
वाशिम-अमरावती महामार्गावर मंगरूळ तालुक्यातील धोत्रा गावातील जुना प्रवासी निवारा कोसळून एका व्यक्तीचा दबून मृत्यू झाला.
जोरदार पावसामुळे हा जुना जीर्ण अवस्थेत असलेला प्रवासी निवारा पावसाने कोसळला. या घटनेमध्ये देमाजी ठोंबरे या व्यक्तीचा दबून मृत्यू झाल्याची माहीती कळतंय.
पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास पोलीस करत आहे.Rain alert
अमरावतीचे ढगफुटीचा व्हायरल व्हिडिओ पहा येथे क्लिक करून..