LPG Gas | ujjwala yojana 01 एप्रिल पासून गॅस सबसिडी सुरू ; फक्त या लोकांनाच मिळणार 200 रुपये गॅस सबसिडी..!!

By Noukarisamachar

Published on:

ujjwala yojana

उज्ज्वला योजनेच्या  लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12  सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान..

ujjwala yojana नमस्कार मित्रांनो आजच्या वाढत्या काळात दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होतच आहे. अशातच गरीब कुटुंबांना या महागाईचा मोठा फटका बसत आहे.  यासाठी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान सुरू केले आहे.

01 एप्रिल 2023 पासून हे अनुदान लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. 

नुकतेच सरकारने एक मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात दोनशे रुपये वाढ केली होती. यामुळे जनतेतून या महागाव विरोधात मोठ्या प्रमाणात रोज व्यक्त केला जात आहे. 

याच पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीवर 200 रुपये अनुदान जाहीर केले आहे.

उज्ज्वला योजनेच्या (पीएमयुवाय) लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.

विविध भू-राजकीय कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस)च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या दरांपासून लाभार्थींचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. 

Crop insurance :- लाखो शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अर्ज. असा करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज..!!

Ujjwala Yojana फक्त उज्वला योजनेतील ग्राहकांना मिळणार अनुदान..

ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे.

योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत.

ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी), स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.

गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी आणि अधिकृत शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ujjwala yojana
ujjwala yojana

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas