आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका..!!
Business electricity rates नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शासनाकडून घेण्यात आलेल्या वीजदरवाडी बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.. या वाढत्या महागाईच्या काळात पेट्रोल डिझेल तसेच इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली. त्याबरोबर नैसर्गिक दगडी कोळसा यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
वीज दरवाढीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. मंडळांनी अधिकृत दोन ते तीन टक्क्यांची वाढ केली आहे. मात्र प्रत्यक्ष या दरवाढीमध्ये 15 ते 16 टक्के वाढ होणार आहे.
कंपनी म्हणते 03 टक्के वाढ झाली ; परंतु प्रत्यक्षात 15 ते 16 टक्के दरवाढ होणार..
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी नागरिकांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला. राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणची दरवाढीची याचिका मंजूर केली. वर्ष २०२३-२४ मध्ये वीजदरात २.९ टक्के व वर्ष २०२४- २५ मध्ये ५.६ टक्के दरवाढ झाल्याचा महावितरणचा दावा आहे, परंतु ही वाढ यापेक्षा कितीतरी अधिक पटीने झाल्याचे दिसते. महावितरणसह बेस्ट, टाटा व अदानी या कंपन्यांची दरवाढ याचिकाही मंजूर झाली आहे.
महाराष्ट्र वीज दरवाढ : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वीज दरवाढीने ग्राहक हैराण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल), बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर यांनी त्यांच्या वीज दरात वाढ केली आहे. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीने वीज ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती विजेचे दर सहा टक्क्यांनी वाढले आहेत.
विजेच्या मागणीत होणार मोठी वाढ..
सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणीही वाढली आहे. त्या स्थितीत महावितरणच्या करारानुसार वीजेने कमाल मर्यादा गाठली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कंपनीने किमान दोन हजार मेगावॅट वीज बाहेरून आणणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महावितरण कंपनीच्या ग्राहकांचे विजेचे दर हे पाच वर्षाचे असतात. या दरांचे नंतर मध्यावधीचे पुनरावलोकन केले जाते. सध्याचे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत.
बीपीएल, शेतकऱ्यांना बसणार फटका..
० ते ३० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या बीपीएल ग्राहकांना आता अधिक पैसे द्यावे लागतील. या श्रेणीमध्ये जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे शेतकयांना आता १६ ते २६ टक्के अधिक पैसे द्यावे लागतील.
Cotton rates today कापूस बाजारात अचानक तेजी पहा आजचे कापुस बाजारभाव..!!
Business electricity rates ..म्हणून वाढले विजेचे दर
आयोगाने २०२०-२१ च्या आर्थिक वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना महावितरणसाठी जो महसूल अंदाजित केला होता तो कोरोना आणि कोळशाच्या संकटामुळे वाढलेला खर्च अशा विविध कारणांमुळे गोळा झाला नाही. परिणामी गेल्या चार आर्थिक वर्षातील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करता दोन वर्षात भरपाई करण्यासाठी विजेचे दर वाढवले गेले आहेत.
राजस्थानमध्ये 500 रुपये सिलेंडर 100 युनिट वीज मोफत.. महाराष्ट्रात कधी