mahadbt tractor subcidy राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
mahadbt tractor subcidy नमस्कार शेतकरी बांधवांनो दिवसेंदिवस शेतीच्या वापरामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना शेती करणे सोयीस्कर व्हावे आणि यातून त्यांचे उत्पन्न वाढावे असा हेतूने शासनाने महाडीबीटीमार्फत राज्य कृषी मंत्री करण योजना राबवत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मिनी ट्रॅक्टर वर सव्वा लाख रुपये अनुदान दिले जाते आज आपण या पोस्टच्या माध्यमातून यासाठी कसा अर्ज करायचा काय पद्धत असणार आहे आणि काय कागदपत्रे लागणार याची सर्व माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
उद्देश :
-
- प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
- जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
धोरण :
- कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे
mahadbt tractor subcidy अनुदान:-
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – 1 लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
लाभ :-
-
- या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
-
- १) ट्रॅक्टर,
-
- 2) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- 3) बैल चलित यंत्र/अवजारे
- 4) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- 5) प्रक्रिया संच
- 6) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- 7) फलोत्पादन यंत्र/अवजारे
- 8) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- 9) स्वयं चलित यंत्रे
- 10) पॉवर टिलर
सर्व अवजारांची यादी व किती अनुदान दिले जाते यांची यादी येथे पहा
mahadbt tractor subcidy पात्रता:–
- १) शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे
- २) ७ /१२ व ८अ उतारा असणे आवश्यक.
- ३) अनु.जाती/ जमाती असल्यास जातीचा दाखला.
- ४) बँक पासबुक
- ५) पाच हे. क्षेत्राच्या मर्यादेत लाभ
- ६) वीज कनेक्शन असणे आवश्यक
- ७) वीज बिलाची ताजी प्रत
mahadbt tractor subcidy लॉटरी मधे निवड झाल्या नंतर लागणारी कागदपत्रे(अपलोड करावी लागतात ):-
१) ७/१२ व ८अ२) उत्पन्न दाखला३) जातीचा दाखला४) विज बिल.५) स्वयं घोषणा पत्र६) पुर्व संमती पत्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Home/Index