EPF Higher Pension Scheme :- तुम्हाला जास्त पेन्शन हवे असल्यास, तुमच्यासाठी ३ मे २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी पेन्शन योजना (Pension Scheme) उपलब्ध होती. तथापि, मुदत वाढवण्यात आली आहे. जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी किंवा नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चे सदस्य होते, परंतु त्यांनी उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज केला नाही, त्यांना 26 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
मात्र आता पुन्हा मुदत वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी देणारा निर्णय दिला होता.
What is EPF 95 Pension scheme ? – कर्मचारी पेन्शन योजना काय आहे ?
संघटित क्षेत्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरदारांना निवृत्तीनंतर मदत करण्यासाठी 1995 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना (EPS) सुरू करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेसाठी पात्र असलेले सर्व कर्मचारी देखील EPS साठी पात्र असतील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही संघटना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन देण्याचे सर्व काम पाहते तसेच भविष्य निर्वाह निधी व्याजदर या संबंधित सर्व कामे ईपीएफ द्वारे पाहिले जातात. कर्मचारी 58 वर्षांचे झाल्यावर त्यांना पेन्शन मिळेल. योजनेचे फायदे सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन ईपीएस कर्मचाऱ्यांना लागू आहे .
कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या 12% आणि महागाई भत्ता (DA) EPF मध्ये योगदान देतात. कर्मचार्यांचा संपूर्ण भाग EPF मध्ये जातो, तर जमा केलेला पीएफ योगदान 8.33 टक्के दराने EPS मध्ये जाते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर, योजना उत्पन्नाचा एक स्थिर प्रवाह प्रदान करते.
ज्या कर्मचाऱ्यांनी एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाढीव पेन्शन मिळत आहे. वाढीव पेन्शन मिळण्याकरिता सध्या कर्मचारी अर्ज करत आहेत पण वाढीव निवृत्ती वेतन घेतल्यास पीएफ खातेधारकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
What is higher pension ?? वाढीव पेन्शन म्हणजे नेमके काय ?
सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे म्हणले तर, तुम्हाला निवृत्तीनंतर जी एक रकमी तुमच्या पीएफची pf रक्कम मिळणार आहे त्या रकमेतील थोडे थोडे पैसे कमी होतील आणि तुम्हाला जास्त पेन्शन भेटेल..
तुम्ही उच्च पेन्शन योजना निवडली तर सेवानिवृत्तीनंतर एकरकमी मिळणारी रक्कम कमी होईल आणि या बदलामुळे पेन्शनची रक्कम वाढेल.
What is last for eps higher pension apply ? अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
सुरुवातीला अर्ज करण्यासाठी 3 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
Pension Scheme News पूर्वी, ऑनलाइन अर्जाची सुविधा ३ मे २०२३ पर्यंत उपलब्ध होती. आता, २६ जून २०२३ पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ पात्र कर्मचारी २६ जूनपर्यंत सेवानिवृत्तीच्या उच्च लाभांसाठी त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज करण्याकरिता 26 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कामगाराकडून केली जाते भविष्याची आकडेमोड: कामगाराचे पेन्शन कडे लागले लक्ष.
EPF Higher pension Calculator :-
ईपीएफ उच्च पेन्शनची गणना करण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे: मासिक पेन्शन रक्कम = (पेन्शनपात्र वेतन X पेन्शनयोग्य सेवा)/70.
epf higher pension scheme जास्तीची पेन्शन घेण्याने तुमच्या भविष्य निर्वाह निधीवर काय परिणाम होणार..??
तुम्ही जर जास्तीची पेन्शन घेणार असाल तर तुमच्या भविष्य निर्वाह निधीतील थोडे थोडे पैसे कमी केले जातील आणि तुमच्या जास्त मिळणाऱ्या वाढीव पेन्शनमध्ये ते मिळवले जातील. यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम कमी होणार आहे.
Particulars | Details |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ईपीएफमध्ये उच्च पेन्शनसाठी अर्ज कसा करावा?
2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन अर्ज करण्यासाठी पुढील माहितीचा अवलंब करा.
Step 1: कर्मचाऱ्यांनी EPFO युनिफाइड मेंबर पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे .
पायरी 2: ‘उच्च पगारावरील पेन्शन: जॉइंट ऑप्शनच्या प्रमाणीकरणासाठी ऑनलाइन अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
पायरी 3: तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.
EPFO प्रत्येक अर्जाची डिजिटली नोंदणी करेल आणि अर्जदाराला पावती क्रमांक प्रदान करेल. हे अर्ज संबंधित नियोक्त्यांना पाठवेल, जे पुढील प्रक्रियेसाठी ई-स्वाक्षरी/डिजिटल स्वाक्षरीद्वारे त्यांची पडताळणी करतील. APFC/RPFC-II प्रकरणाची तपासणी करेल आणि उच्च निवृत्ती वेतनाचा निर्णय अर्जदारांना ईमेल, पोस्ट, फोन किंवा एसएमएसद्वारे पाठवेल.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?
1. प्रश्न:- उच्च पेन्शन योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:- उच्च पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2023 आहे.
2. प्रश्न:- उच्च पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते ?
उत्तर :- जे कर्मचारी ०१/०९/२०१४ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत असे सर्व कर्मचारी उच्च पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत.
3. प्रश्न:- उच्च पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन वेबसाईट कोणती आहे ??
उत्तर:-अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे… https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/