Kitchen Jugaad
माझ्या माता माऊल्या आई बहिणींना आता कणिक मळताना त्यांच्या हाताला कुठलेही पीठ लागणार नाही चला तर जाणून घेऊया काय आहे ही ट्रिक आणि कसे मळायचे आता कणिक जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि पहा व्हायरल व्हिडिओ..
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
IMD:- 1 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कसा असणार हवामान अंदाज पहा फक्त एकच मध्ये..!
Kitchen Jugaad: छान मऊ पोळ्या होण्यासाठी लाटण्याच्या, शेकण्याच्या सह पीठ मळण्याच्याही काही पद्धती तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात.
आपल्या सगळ्यांच्या घरात दिवसातून एकदा तरी पोळ्या बनवल्या जातात. या पोळ्या बनवून लगेच खाल्ल्या तर चवीलाही छान लागतात शिवाय तोडण्यासाठी दातांना व पचनासाठी पोटाला फार मेहनत घ्यावी लागत नाही.
छान मऊ पोळ्या होण्यासाठी लाटण्याच्या, शेकण्याच्या सह पीठ मळण्याच्याही काही पद्धती तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात.
पीठ मळताना हा चिकट न करता कसे पीठ मळायचं पहा व्हायरल व्हिडिओ..
चपातीचे पीठ मळताना अनेकदा पाणी जास्त होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला अगदीच कमी पाणी घेतो पण नंतर पीठ कोरडंच झालं म्हणून वरून पाणी ओतायला जातो,
या सगळ्यात बहुतांशवेळा मोजमाप चुकून पीठ चिकट होतं. हे चिकट पीठ हाताला असं काही चिकटून राहतं की
मग एक हात साफ करताना दुसरा हात आणि मग तो साफ करताना किचनमधील सगळे कपडे एकूण एक वस्तू खराब होऊ लागते.
या सगळ्या सगळ्या त्रासांवर दोन भन्नाट जुगाड सध्या व्हायरल होत आहेत.
पाळण्याच्या काही सोप्या आयडिया सांगितल्या आहेत. त्या थोडक्यात आपण आता समजून घेऊया.
पहिल्या चॅनेलवर सांगितल्यानुसार तुम्हाला पीठ मळताना अगदीच मॉडर्न पर्याय वापरता येऊ शकतो.
थेट एका मिक्सरच्या भांड्यात आवश्यक तेवढं पीठ, मीठ आणि पाणी घालून तुम्ही चक्क मिक्सरला पीठ मळून घेऊ शकता.
गरजेनुसार यामध्ये काही थेंब तेल सुद्धा मिसळता येईल. पाणी हळू हळू व कमी प्रमाणातच टाका नाहीतरी पिठाची अक्षरशः पेस्ट होऊ शकते.
यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पीठ मळताना हात वापरतच नसल्याने हात चिकट व्हायचा प्रश्नच येत नाही.
तर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही पीठ मळण्यासाठी लाकडी पळी किंवा डावाचा वापर करू शकता. जेणेकरून हाताला पीठ चिकटत नाही.
हे दोन्ही उपाय व्हिडीओसहित सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हे खरोखरच कामी येऊ शकतात असे म्हणायला हरकत नाही.
यामुळे तुमचा किचनमधील वेळ, कष्ट व चिडचिड सगळं कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते. कशी वाटली ही कल्पना? आम्हाला कळवायला विसरू नका.Kitchen Jugaad
पीठ मळताना हात चिकट न करता कसे मळायचे पीठ पहा व्हायरल व्हिडिओ..