Animal husbandry:- गाय म्हैस यांच्या गोठ्याकरिता मिळत आहे 2 लाख 50 हजार रुपये अनुदान.. तात्काळ अर्ज करा..!

By Noukarisamachar

Published on:

Animal husbandry

नमस्कार शेतकरी बांधवांना सध्या शासनाने शेतकरी बांधवांसाठी आणि गोरगरीब लोकांसाठी एक नवीन योजना राबवली आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडेशेतकऱ्यांकडे गाई म्हशी आहेत.

त्या शेतकऱ्यांना आता राहण्याकरिता सरकार देत आहे अडीच लाख रुपये त्यांच्या गोठा तयार करण्याकरिता..

पहा कसा अर्ज करायचा आणि दोन लाख 50 हजार रुपये अनुदान कशाप्रकारे मिळवायचं जाणून घ्या सविस्तर माहिती खालील प्रमाणे..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Crop loan list:- सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या जाहीर..!

तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच शिंदे सरकार आल्यापासून अगदी चांगल्या प्रकारे नवनवीन योजना हाती घेत आहे आणि त्या योजनेमुळे गोरगरीब शेतकरी मायबापांना चांगली प्रकारे मदत होत आहे.

त्याच प्रकारे ही योजना तशीच आहे या योजनेमध्ये जो शेतकरी ऑनलाईन अर्ज करेल त्यांना गाय गोठा ची अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार.

पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.

राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना)

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?

➡️ गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरायचा आहे.

गाय गोठा चा अर्ज कसा भरायचा पहा येथे क्लिक करून..

या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप कराव्यात.

वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसन्या / तिसऱ्या वेतातील असावीत.Animal husbandry

Animal husbandry
Animal husbandry

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas