Chara chhavni :- यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही चाऱ्याचे पैसे थेट बँक खात्यात??

By Noukarisamachar

Published on:

Chara chhavni

Chara chhavni

यंदा चारा छावण्यांना परवानगी न देण्याचे सरकारने ठरवले आहे .

दरवेळेस होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकारने चारा छावण्यांना परवानगी न देण्याचे ठरवले आहे.

प्रत्येक वेळेस चार डेपो मधून भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात तर यावेळेस निवडणूक जवळ असल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप सरकारला महागात पडू शकतात त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा.

चाऱ्याऐवजी चाऱ्याचे पैसे बँक खात्यात येण्याचे धोरण विचाराधीन असल्याचे समजत आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे .

तर एकीकडे सतत धरणाच्या पाण्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. सततच्या येणाऱ्या आकडेवारीनुसार हे आपल्यासमोर निदर्शनास येते.

व सतत पाण्यासाठी होणारी टँकरची संख्या वाढत चालली आहे यामध्ये आता जनावराचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठवाड्यासह महाराष्ट्राचा पश्चिम आणि उत्तर भागामध्ये जनावराच्या चाऱ्याची टंचाई आपल्याला पाहण्यास मिळत आहे.

या भागात चाऱ्याची टंचाई असल्यामुळे शेतकरी तेथील नेत्यांकडे जाऊन चारा छावणी सुरू करण्याची मागणी करत आहेत.

Mumbai weather heat wave:- राज्यात येणार उष्णतेची लाट फ्रिज मधले जास्त थंड पाणी न पिण्याच्या सल्ला..

त्यामुळे निवडणुकीच्या गटमटीत त्यांची ही मागणी सरकारला धुडकावून लावता येत नाही तर दुसरीकडे छावणी चालू केल्यावर चारा डेपो मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होतात.

त्यामुळे सरकार हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव आहे.

Chara chhavni

ज्या भागात चारा छावणी जी मागणी होईल त्या भागात सक्षम अधिकारी जाऊन  तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान रक्कम देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली.

ज्याप्रमाणे काही दिवसापूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात दुधाचे अनुदान जमा झाले त्याचप्रमाणे हे धोरण राबविले जाणार असल्याचे कळत आहे.

राज्यात 3 कोटी 29 लाख जनावरे असून दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना 173 मॅट्रिक टन चारा बियाणे उपलब्ध केले असून…

त्यातून 27 लाख 71 हजार चारा जमा झाला असून हा चारा दुष्काळजन्य परिस्थिती चा सामना करण्यासाठी पुरेसा असल्याचे समजत आहे . 

अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Chara chhavni

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas