Cotton Market : भाव वाढ होईल या अशाने शेतकरी बांधवांनी आपल्या घरात कापूस दाबून ठेवला.
मात्र मार्च महिना संपत आला तरीही कापसाचे भाव काय वाढायला तयार नाहीत.
अशातच कापसामध्ये आळ्या झाल्याने मोठ्या प्रमाणात अंग खाजायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव मिळेल त्या भावात कापूस विक्री करत आहेत.
मार्च महिन्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली. देशातील वाढलेली आवक आणि अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रातील संकट यामुळं बाजारावर दबाव आहे.
त्यामुळं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊनही दरात सुधारणा झाली नाही.
पण ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बॅकींग क्षेत्रात अस्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदार शेतीमाल बाजारातील गुंतवणूक कमी करतात.
त्याचाच फटका सध्या कापसालाही बसत आहे. पण ही स्थिती जास्त काळ चालणार नाही, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Cotton Market कापूस भावात किती सुधारणा होऊ शकते?
सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय.
एप्रिलच्या महिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आवकेचा दबाव राहू शकतो.
या काळात जास्तीत जास्त कापूस बाजारात येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
त्यानंतर मात्र आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते. कापसाची सरासरी दरपातळी किमान ३०० ते ४०० रुपयाने सुधारु शकते.
असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
मात्र कापूस बाजार भाव दहा हजारच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.
असे तज्ञांचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून कापूस विक्री करावा यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.
Cotton Market
आजचे महत्त्वाचे बाजार समितीमधील कापुस बाजार भाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर.
आजचे कापुस बाजार भाव खालील प्रमाणे..!!