Mansoon Update
नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये सध्या मान्सूनचे आगमन अगदी चांगल्या प्रकारे झालेले दिसून येत आहे आणि आणखी आज आणि उद्या म्हणजेच येत्या 24 तासांमध्ये या जिल्ह्यामध्ये असणार भयंकर पाऊस…
थोडंच पण महत्त्वाचं..
राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहे, व हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे,
राज्यातील बहुतांश भाग हा पावसाने व्यापून गेलेला आहे, त्याचप्रमाणे अनेकांकडून पाऊस कधी येणार याची वाट चालूच होती,
अशातच पावसाच्या सरीवर बरसल्याने वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे, परंतु काही भागांमध्ये सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे.
आणि मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकलेला असल्यामुळे व पूर्वेकडील सक्रिय कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे झुकलेला असल्याने
पूर्वेकडील भागांमध्ये विस्तारलेला आहे, व गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
या जिल्ह्यामध्ये असणार आज 24 तासात भयंकर पाऊस..
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे,व त्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम,बुलढाणा,गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये हवामान विभागाने जोरदार म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे,
त्याचबरोबर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार आहे असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे, त्याचप्रमाणे वाऱ्याची स्थिती वायव्यकडे झुकलेली आहे.
व याच कारणामुळे महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.Mansoon Update