Mega Bharti 2023  मेगा भरती 2023

By Noukarisamachar

Updated on:

🔰Mega Bharti 2023 

Now the competitive exams for recruitment in the state will be conducted by TCS-ION and IBPS companies.

Read More details about Mega Bharti 2023 are given below.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.

आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻→

🔰आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

CM Eknath Shinde Mega

Bharti 2023 

 

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.

संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे.

राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 42 हजार 305  जागा रिक्त आहेत.

एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 70 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

🔰राज्य सरकारकडून नुकतीच 70 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा Mega Bharti 2023 

मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

यात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून देखील मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला होता.

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकलेली नाही.

त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 70 हजार नोकर भरती केली जाणार आहे.

त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील.

मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत.

आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे

नोकरीची संधी : महाराष्ट्रात 70000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती.Mega Bharti 2023 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🔰आधिक माहीतीसाठी येथे क्लिक कर ?

 

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas