PM Kisan Yojana एक फोटो काढून आपल्या फोनवर करा केवायसी ; ज्या लोकांना मिळाला नाही 13 वा आता त्या लोकांनाही मिळणार आता Pm Kisan चा 14वा हप्ता..

By Noukarisamachar

Published on:

PM Kisan Yojana आता शेतकरी फोनवर फेस ऑथेंटिकेशनसह E-Kyc  अपडेट करू शकनार !!

 

PM Kisan Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये तसेच मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे मिळून

12000 हजार रुपये शेतकरी बांधवांना दरवर्षी दिले जाणार असल्यामुळे. या योजनांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे माहिती तपासण्याचे काम सुरू आहे त्यामुळे पीएम किसान च्या चौदाव्या हाताला थोडाफार उशीर होऊ शकतो. 

नुकतीच कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांना सूचना करण्यात आलेल्या आहेत शेतकरी बांधवांनी पीएम किसान च्या पोर्टलला भेट देऊन ई -केवायसी करून घ्या किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

परंतु pm kisan e-Kyc केवायसी करण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांना ओटीपी OTP येत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे शेतकरी बांधव कंटाळून जाऊन केवायसी प्रक्रिया करत नाहीत ही बाब समोर आल्यानंतर आता शेतकरी बांधवांना केवायसी पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

याद्वारे शेतकरी बांधव मोबाईल ॲपच्या साह्याने एक सेल्फी घेऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

PM Kisan Yojana सेल्फी घेऊन करता येणार E-kyc केवायसी प्रक्रिया पूर्ण..

या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई – केवायसी प्रमाणिकरणा सह  आपल्या आसपासच्या 50 शेतकरी बांधवांचे  सुद्धा ई – केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे.

PM Kisan Yojana मोबाइलद्वारे ई – केवायसी प्रमाणिकरण असे करा..

Face Kyc फेस केवायसी करण्यासाठी शेतकरी बांधवांना खालील दोन मोबाईल एप्लीकेशन चा उपयोग करावा लागणार आहे.

  1. सर्वप्रथम पीएम किसान गोल या आपलिकेशन चा बेसिक माहिती भरण्यासाठी तसेच केवायसी प्रक्रियेकडे नेण्यासाठी वापर करावा लागेल– PMKISAN Gol मोबाईल ॲप 
  2. यानंतर Addhar Face RD या ॲप्लिकेशनचा उपयोग सेल्फी घेऊन केवायसी करण्यासाठी करावा लागेल.– FACE RD APP

ॲपचा उपयोग करून केवायसी प्रक्रिया कशी करावी.

  • सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी वरील लिंक चा वापर करून ‘पीएमकिसान गोल’ या नावाचे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असलेले एप्लीकेशन डाऊनलोड करून आपल्या मोबाईल वरती इन्स्टॉल करावे.
  • हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा पर्याय निवडावा.
  • पुढे येणाऱ्या  स्क्रीनमध्ये शेतकरी बांधवांनी Login type लॉगिन टाईप मध्ये बेनिफिशरी Benifishary हा पर्याय निवडून पीएम किसान ID किंवा आधार क्रमांक याचा वापर करून लॉगइन करावे.
  • आधार नंबर टाकल्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी येणार आहे हा ओटीपी टाकून लॉगिन करावे.
  • यानंतर पुढे तुम्हाला सहा अंकी एक MPIN तयार करायचा आहे.जो की तुम्हाला भविष्यात कामे येईल.
  • ज्या शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना येथे एक नोटिफिकेशन दिसेल.

    Pm Kisan Yojana
    Pm Kisan Yojana
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी समोर दिसणाऱ्या ई – केवायसी या लिंकवर क्लिक करावे.
  • नंतर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी पीन प्रविष्ठ करावा.
  • तद्नंतर समोर दिसणाऱ्या स्कॅन फेस या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर फेस आरडी ॲपची लिंक येईल ते ॲप घ्यावे.
  • त्यानंतर मोबाइल मध्ये कॅपच्युरिंग फेस सुरू होईल, त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून प्रोसिड या बटनावर क्लिक करावे.

ही सर्व प्रोसेस केल्यानंतर शेतकरी बांधवांनी मोबाईलसमोर धरून चेहन्यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करावे.

 इमेज कॅपचर सक्सेसफुली प्रोसेसिंग असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर सक्सेसफुल ई – केवायसी असा इंग्रजीमध्ये तुम्हाला एक मेसेज दिसेल हा मेसेज दिसल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

इतर शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी..

यासाठी तुम्हाला परत एकदा बोर्डवर यावे लागेल तेथे तुम्हाला KYC for other beneficiary हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचे आहे.

या वरती क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे सर्व प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या चौदाव्या हप्त्याचे चार हजार रुपये मिळतील.

शेतकरी बांधव वरील प्रमाणे केवायसी करण्यासाठी तुमच्या जवळील एखाद्या सुशिक्षित व्यक्तीची मदत घेऊ शकता किंवा आपल्या मुलांच्या साह्याने ही प्रक्रिया अगदी घरबसल्या शून्य रुपयात पूर्ण करू शकतात यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी लागत नाही किंवा पैसे द्यावे लागत नाहीत.

यासाठी फक्त तुम्हाला वर दिलेले दोन एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहेत या आपलिकेशन च्या साह्याने जवळजवळ तुम्ही 50 शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. PM Kisan Yojana

♥Pm Kisan Registration 2023 नवीन रजिस्ट्रेशन झाले सुरू, या पद्धतीने करा नोंदणी दरवर्षी मिळतील 12,000 रुपये.

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

 

पी एम किसान चा लाभ घ्यायचा असेल तर पुढील बाबी बंधनकारक :-

  • शेतकरी बांधवांनी ई -केवायसी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी बांधव पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन केवायसी करू शकता किंवा तुमच्या जवळील CSC सेतू केंद्राला भेट द्या. .
  • बँक खाते आधार लिंक करणे गरजेचे. चौदावा हप्ता मिळविण्याकरिता शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते आधार लिंक करण्याचे गरजेचे आहे. यासाठी बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता.

Pm Kisan Yojana आता फक्त नोंदणी क्रमांक प्रमाणे दिसणार संपूर्ण माहिती :-

पूर्वी पीएम किसान च्या वेबसाईटवर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर नुसार तुम्हाला संपूर्ण माहिती पाहता येत होती.

परंतु आता नवीन अपडेट नुसार तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा नोंदणी क्रमांक द्यावा लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला कोणती माहिती दिसणार नाही.

नोंदणी क्रमांक याप्रमाणे जाणून घ्या

तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आठवत नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन. Know Your Registration Number वर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी क्रमांक दिसेल.

♦IMD Weather alert राज्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे येलो अलर्ट जारी.. 

♦Onion price today :-आजचे कांदा बाजार भाव

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas