RTE admission :- आज पहिली निवड यादी जाहीर ; येथे पहा कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या शाळेमध्ये भेटेल प्रवेश..!!

By Noukarisamachar

Published on:

RTE admission

ऐकलं का मंडळी..  RTE admission प्रवेशाची पहिली निवड यादी आज दिनांक 12 एप्रिल दुपारी 04 नंतर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी संदेश sms वर अवलंबून न राहता . अधिकृत साइटवर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन चेक करावी. आपल्या पाल्याची निवड झाली किंवा नाही आणि जर निवड झाली असेल तर त्याला कोणत्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे याची सर्व माहिती खातर जमा करून 25 एप्रिल च्या अगोदर आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करावा.

RTE lottery  result 2023 आज दिनांक 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी RTE महाराष्ट्र 1ली ते इयत्ता 8 वी प्रवेशासाठी अर्ज केला होता. अधिकृत वेबसाइटवर, ते आरटीई महाराष्ट्र लॉटरी निकाल 2023, जिल्हा-दर-जिल्हा निवड आणि गुणवत्ता यादी मिळवू शकतात आणि प्रतीक्षा यादी 12 एप्रिल 2023 रोजी उपलब्ध करून दिल्या आहेत.

आरटीई महाराष्ट्र लॉटरी निकाल 2023-24 ची लिंक असेल.

rte25admission.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे .

 

RTE admission पालकांनी खालील दिलेले कागदपत्रे आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तयार ठेवावी..

 

RTE admission प्रवेश घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

बालकाच्या जन्माचा दाखला.

पालकांच्या रहिवासी, वास्तवाचा पुरावा: रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज – टेलिफोन बिल, पाणी बिल, मालमत्ता करायची पावती, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, मतदान ओळखपत्र व पासपोर्ट यापैकी कोणतेही एक.

वंचित जात संवर्गातील असल्यास: जात प्रमाणपत्र आवश्यक, उत्पन्नाचे दाखले ची गरज नाही. (पर राज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.)

दिव्यांग असल्यास: जिल्हा शालेय चिकित्सांनी दिलेला चाळीस टक्के पेक्षा अधिक दिव्यांग असल्याचा दाखला.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास: तहसीलदार दर्जाच्या महसुलअधिकाऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वेतन पावती, (आर्थिक वर्ष 2021 – 22 किंवा 2022- 23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला.

घटस्फोटीत महिला असल्यास: न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिलांचा रहिवासी पुरावा, विधवा महिलाचा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र व रहिवासी पुरावा, एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांच्यापैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे. बालक अनाथ असल्यास अनाथाचे कागदपत्रे धरण्यात यावीत.

Mp land Record :- वारस हक्काची नोंदणी ऑनलाईन कशी करावी ..?? आता घरबसल्या ऑनलाईन करा वारसाची नोंदणी 2 मिनिटांत..!

 

RTE admission
RTE admission

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas