Talathi Bharti 2023:- तलाठी भरती 2023 चे वेळापत्रक जाहीर.. तात्काळ वेळापत्रक पहा..!

By Noukarisamachar

Published on:

Talathi Bharti 2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे सध्या तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती कधी आहेत तलाठी भरती चे पेपर..

थोडस पण महत्त्वाचं..

Employees salary:- सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली एवढ्या रुपयांनी वाढ.आता सरसकट एवढे पैसे मिळणार..!

संपूर्ण राज्यातील तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी. गेल्या दोन दिवसांमध्ये तलाठी भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे चला तर पाहूयात खालील प्रमाणे..

राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठीची येत्या काही दिवसांत लिंक खुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत.

या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने TCS कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.

यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे. याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले, ‘या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. येत्या १५ जूनपर्यंत ही लिंक खुली होईल अशी अपेक्षा आहे.Talathi Bharti 2023

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे.

अधिक माहिती पहा येथे क्लिक करून..

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas