animal husbundry Scheme दुधाळ गाय, म्हैस गट वाटपा योजनेस मंजुरी; शासन निर्णय आला ! : या लोकांनाच मिळणार लाभ

By Noukarisamachar

Published on:

animal husbundry

गाई – म्हैस गट वाटप योजना 2023 घ्या जाणून संपूर्ण माहिती

 

animal husbundry Scheme या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.

गाई म्हैस गट वाटप योजना 2023 अर्ज कसा व कुठे करावा?

 1. योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप उपलब्ध करण्यात आलेले आहे.
 2. त्यामुळे अर्ज करण्यासाठी AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.
 3. आपल्या मोबाइल मध्ये सन 2021-24मध्ये AH-MAHABMS मोबाइल App डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल
 4. प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
 5. अर्जदारांनी अर्ज करते वेळी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे.
 6. तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील.
 7. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

गाई म्हैस गट वाटप योजना 2023 लाभ कोण घेऊ शकते?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना हि योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

animal husbundry Scheme अर्जदाराला लाभ देण्याच्या अटी कोणत्या?

 • सन 2022-23 मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद लाभार्त्याने घ्यावी.
 • गाई म्हैस गट वाटप योजनेची कार्यप्रक्रिया काय आहे?
 • अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.
 • योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने Text SMS प्राप्त होतील. तसेच प्रणालीवर सूचनाही प्राप्त होतील.
 • योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

आम्ही या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न या लेखात केलेला आहे. अद्याप तुम्हाला काय शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळावू शकता. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM).
टोल फ्री संपर्क -18002330418 (8AM to 8PM).

 

Pm Kisan पी एम किसान 14 वा हप्ता पात्र लाभार्थी यादी अधिकृत वेबसाईटवर जाहीर..!! फक्त याच लोकांना मिळणार 14 वा हप्ता….

 

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

सदरची योजना राज्यात उपरोक्तप्रमाणे सुधारित किमतीनुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात यावी. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना 02 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येईल. ज्यामध्ये गाय गटासाठी 75 टक्के म्हणजेच रु. १,१७,६३८/- किंवा म्हैस गटासाठी रु. १,३४,४४३/- शासकीय अनुदान देय राहील.

अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्यास स्वतः उभारावी लागेल किंवा बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज (loan) घेणाऱ्या (5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बँकेचे कर्ज) याप्रमाणे लाभार्थ्यास योजनाअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

Animal Husbundary Scheme तपशील ०२ देशी/०२ संकरीत गायीच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान ०२ म्हशीच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान
02  जनावरांच्या एका गटाची किंमत (प्रति गाय रु. 70,000/- व प्रति म्हैस रु. 80,000/- याप्रमाणे रु.1,05,000 रु. 1,20,000/-
जनावरांच्या किमतीस अनुसरून कमाल 10.20 टक्के (अधिक 18 टक्के सेवाकर) दराने 3 वर्षाचा विमा उतरविणे. रु. 13,628/- रु. 14,443/-
प्रतिगट एकूण देय अनुदान रु. 1,17,668/- रु.1,34,400/-

 

animal husbundry Scheme अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 • सातबारा (अनिवार्य)
 • 8 अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

 

शासन निर्णय (GR) येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय दुधाळ किंवा म्हशींचे गट वाटप योजना

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 6/4/2 दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सदर योजनेस दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 6/4/2 संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे या नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी मंजुरी देण्यात आली.
या शासन निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत वाटप करावयाच्या 6/4/2 संकरित गाई किंवा मशीनचे वाटप या योजनेमध्ये दुधाळ गाईंच्या यामध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी ,थारपारकर ,देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.Animal Husbundary Scheme

Weather Update | पंजाबराव डक हवामान अंदाज : आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट सह, वादळी पावसाचा इशारा..!! 

animal husbundry
animal husbundry

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas