EPF 95 Pension scheme :-  EPF वाढीव पेन्शन साठी अर्ज केलाय पण ;  फायदे आणि तोटे घ्या सविस्तर जाणून..!!

By Noukarisamachar

Published on:

EPS 95 Pension Scheme

Higher Pension Scheme :- तुम्हाला जास्त पेन्शन हवे असल्यास, तुमच्यासाठी ३ मे २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी पेन्शन योजना (Pension Scheme) उपलब्ध होती. तथापि, मुदत वाढवण्यात आली आहे. जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी किंवा नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चे सदस्य होते, परंतु त्यांनी उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज केला नाही, त्यांना 26 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

EPF 95 Pension scheme नमस्कार मंडळी आज आपण ईपीएफ मार्फत दिल्या जाणाऱ्या वाढीव पेन्शन चे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत.. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळवण्याकरिता अर्ज केले आहेत, परंतु वाढीव पेन्शन घेण्यामागे काय फायदे आणि तोटे आहेत. याची सविस्तर माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..

EPF 95 Pension scheme – कर्मचारी पेन्शन योजना काय आहे.

संघटित क्षेत्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरदारांना निवृत्तीनंतर मदत करण्यासाठी  1995 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना (EPS) सुरू करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेसाठी पात्र असलेले सर्व कर्मचारी देखील EPS साठी पात्र असतील.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही  संघटना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन देण्याचे सर्व काम पाहते तसेच भविष्य निर्वाह निधी व्याजदर या संबंधित सर्व कामे ईपीएफ द्वारे पाहिले जातात.  कर्मचारी 58 वर्षांचे झाल्यावर त्यांना पेन्शन मिळेल. योजनेचे फायदे सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन ईपीएस कर्मचाऱ्यांना लागू आहे .

कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 12% आणि महागाई भत्ता (DA) EPF मध्ये योगदान देतात. कर्मचार्‍यांचा संपूर्ण भाग EPF मध्ये जातो, तर जमा केलेला पीएफ योगदान 8.33 टक्के दराने EPS मध्ये जाते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर, योजना उत्पन्नाचा एक स्थिर प्रवाह प्रदान करते.

ज्या कर्मचाऱ्यांनी एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाढीव पेन्शन मिळत आहे. वाढीव पेन्शन मिळण्याकरिता सध्या कर्मचारी अर्ज करत आहेत पण वाढीव निवृत्ती वेतन घेतल्यास पीएफ खातेधारकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

EPF 95 Pension scheme वाढीव पेन्शन घेण्याचे काय आहेत  तोटे :-

1. PF पीएफ खात्यातील पैसे होणार कमी.

तुम्ही जर वाढीव टेन्शन साठी अर्ज केला असेल तर सर्वात मोठा तोटा तुम्हाला बसणार आहे तो म्हणजे तुमच्या पीएफ खात्यातील पैसे पेन्शन फंडात ट्रान्सफर केले जातात त्यामुळे तुम्हाला व्याजदरही कमी मिळेल आणि तुमच्या पीएफ मधील पैसे देखील कमी होतील. म्हणजे तुमच्या पीएफ खात्यात जेवढी रक्कम तुम्ही आतापर्यंत जमा केली आहे त्याचा थोडा थोडा भाग EPS मध्ये जमा केला जाईल.

epf higher pension scheme जास्तीची पेन्शन घेण्याने तुमच्या भविष्य निर्वाह निधीवर काय परिणाम होणार..??

तुम्ही जर जास्तीची पेन्शन घेणार असाल तर तुमच्या भविष्य निर्वाह निधीतील थोडे थोडे पैसे कमी केले जातील आणि तुमच्या जास्त मिळणाऱ्या वाढीव पेन्शनमध्ये ते मिळवले जातील. यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम कमी होणार आहे.

Particulars Details
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

2. पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम मिळणार नाही.

जर वाढीव पेन्शन घेत असाल तर पीएफच्या सध्याच्या नियमानुसार काही अकस्मिक घटना घडल्यास तुमच्या वारसाला पूर्ण पैसे मिळतात. परंतु तुम्ही जर UPS अंतर्गत वाढीवेशन घेत असाल तर तुमच्या पत्नीला फक्त 50 टक्के पेन्शन मिळेल आणि तुमच्या मुलांना 25 टक्के पेन्शन मिळेल..

EPF Pension Apply Online :- वाढीव पेन्शन साठी केला का अर्ज? लगेच आपला अर्ज करा. अर्ज करण्याची मुदत आली संपत..

उदाहरणार्थ :-  तुम्हाला जर सध्या 20 हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला फक्त 10 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल.

3. एकरकमी पैसे काढण्याची सुविधा मिळणार नाही.

Eps 95 मध्ये तुम्हाला गरजेच्या वेळी अचानक काही काम लागल्यास एक रकमे पैसे काढता येतात. परंतु जर तुम्ही वाढीवेशनसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला गरजेच्या वेळी एक रकमे जास्त रक्कम काढता येणार नाही.

पण हवे असल्यास तुम्ही इतर सरकारी पेन्शन योजना जसे की राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (एनपीएस) गुंतवणूक करू शकता. इथे तुम्हाला मार्केट लिंक्ड रिटर्न मिळतात आणि एकरकमी रक्कम काढण्याचा पर्यायही मिळतो. याशिवाय, या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट आणि ५०,००० रुपयांची आणखी कर सवलत मिळते. EPS 95 Pension scheme

Hallmark नसलेल्या जुन्या दागिन्यांचे काय होणार..?? तुमच्या घरात असतील हॉलमार्क नसलेले जुने दागिने तर मग अवश्य वाचा

 

EPS 95 Pension Scheme
EPS 95 Pension Scheme

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas