land use map नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेत जमिनीचा प्लॉटचा नकाशा कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.
आपण आपल्या शेत जमिनीचा किंवा घराचा प्लॉटचा नकाश ऑनलाइन तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता. आपल्याला जमिनीचा नकाशा विविध कामासाठी उपयोग पडतो आपल्या जमिनीची हद्द पाहण्यासाठी किंवा शेतात जायला रस्ता नसेल तर रस्ता पाहण्यासाठी देखील जमिनीचा नकाशा चा उपयोग केला जातो.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईल वरती ऑनलाईन पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती पहा:-
1. सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईटवर क्लिक http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
करून तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीचा नकाशा तुम्हाला पाहता येणार आहे.
2. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महा भूमि अभिलेख या वेबसाईटवर जाल.
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Desktop site mode ऑन करावा जेणेकरून तुम्हाला हा नकाशा मोठ्या स्वरूपात पाहता येईल.
3. यानंतर तुम्हाला फोटो दाखवल्याप्रमाणे या आडव्या तीन लाईन वर क्लिक करायचे आहे आणि तुमचा जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे.
4. या तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे तुम्हाला जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे.
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हे नक्की वाचा.. Pm Kisan पी एम किसान योजना 13वा हप्ता अपात्र लाभार्थी यादी जाहीर.. या लोकांना भेटणार नाही पीएम किसान चा तेरावा हप्ता.
प्रत्येक बाबीवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे साईट लोड होईल आणि संपूर्ण नकाशा व्यवस्थित दिसेल.
अशाप्रकारे नकाशा लोड झाल्यानंतर तुम्ही गट नंबर वरती क्लिक करून तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करू शकता आणि व्यवस्थित रित्या पाहू शकता.