Pik Vima Update Maharashtra आनंदाची बातमी.. फक्त “या” 16 पिकांना मिळणार एक रुपयात पिक विमा फक्त “या” वेबसाईटवरच सादर करा पिक विमा अर्ज..

By Noukarisamachar

Published on:

Pik Vima Update Maharashtra

Pik Vima Update Maharashtra

खुशखबर ! शेतकऱ्यांना ‘त्या’ 16 पिकांसाठी मिळणार एक रुपयात पिक विमा, ‘या’ तारखेपर्यंत वेबसाईटवर सादर करता येणार अर्ज, वाचा…

शिंदे सरकारने मार्च महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केली. त्यानंतर बराच काळ उलटला मात्र योजनेचा शासन निर्णय काही जारी होत नव्हता.

कांदाचाळ अनुदान आता कांदाचाळसाठी 1 लाख 60 हजार रुपये अनुदान ; अर्ज सुरू एथे करा ऑनलाइन अर्ज

त्यामुळे एक रुपयात पिक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. मात्र, शिंदे सरकारने नुकताच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान पीक विम्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेअंतर्गत किती पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे तसेच त्यासाठी कुठे अर्ज करावा लागणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.Pik Vima Update Maharashtra

Pm Kisan New Website नवीन वेबसाईट सुरू आता घरबसल्या करा Kyc, चुकामध्ये सुधारणा, खाते नंबर जोडणे..

मिळालेल्या माहितीनुसार, एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामामध्ये तब्बल 14 प्रकारच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. या 14 पिकांसाठी विमा काढताना शेतकऱ्यांना मात्र एक रुपया भरावा लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिश्याची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या खरिपातील पिकांसाठी विमा संरक्षण एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करता येणार आहे..

राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामापासून पिक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. आता या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पिक विम्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी पिक विम्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीकविमा संरक्षण मिळण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज सादर करायचा आहे.

farmer big update शेतकऱ्यानो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे देखील आवश्यक आहे. Pik Vima Update Maharashtra

Pik Vima Update Maharashtra
Pik Vima Update Maharashtra

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas