Rain Update राज्यात पुढील 5 दिवस राहणार मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट.. पुढील पाच दिवस कसे असणार वातावरण जाणून घ्या!

Rain Update

राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे.

अजून पुढील चार, पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

थोडंच पण महत्त्वाचं..

Deshi Jugad कापसासह इतर पिकांना खत टाकण्याची सोपी पद्धत शेतकऱ्याच्या मुलाने बनवले टाकाऊ पासून टिकाऊ यंत्र..!

तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मान्सून शेतकऱ्याला आनंददायक पीक करून देत आहे त्यामुळे शेतकरी अगदी चांगल्या प्रकारे सुखी आहे.

राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे.

राज्यातील काही ठिकाणी २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने १०० मिमी जास्त बरसला आहे.

लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आगामी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Crop loan list:- सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या पहा सविस्तर..!

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे.

धरणाचा पाणीसाठा 37.36 टक्के झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.

कोयना नगर 253 मिमी, नवजा 272 मिमी तर महाबळेश्वर 331 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोणावळ्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. तीन दिवसांत 700 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस लोणावळ्यात झाला आहे.Rain Update

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Rain Update
Rain Update

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas