RTE admission 2023 24 शासनामार्फत गरीब समाजातील मुलांना मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अंतर्गत म्हणजेच आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया बाबत महत्त्वपूर्ण अपडेट शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे.
नवीन निर्णया अंतर्गत प्रवेशाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे पूर्वी 08 मे पर्यंत प्रवेश करणे बंधनकारक करण्यात आले होते ,परंतु ही मुदत वाढवून आता कागदपत्र पडताळणीसाठी 15 मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे शिक्षण विभागामार्फत आव्हान केले आहे.
RTE admission पालकांना दिलासा :-
पाच एप्रिल रोजी सोडत यादी जाहीर झाल्यानंतर 13 एप्रिल रोजी आरटीओच्या पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र अनेक पालकांना एसएमएस आले नव्हते. RTE ऍडमिशनच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे अनेक पालकांना हमीपत्र आणि प्रवेश पत्र देखील डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येत असल्याचे समोर आले होते. अशातूनच याची दखल घेत शासनाने प्रवेशास निश्चित करण्यासाठी 15 मे पर्यंत निश्चित मुदतवाड देण्यात आल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे.
RTE Admission : मुदतवाढ परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
EPF 95 Pension scheme :- EPF वाढीव पेन्शन साठी अर्ज केलाय पण ; फायदे आणि तोटे घ्या सविस्तर जाणून..!!