Character Certificate पोलीस भरती शासकीय, खाजगी नोकरी साठी लागणारे चारित्र्य प्रमाणपत्र कसे काढावे.?? लागणारे कागदपत्र प्रक्रिया याची संपूर्ण माहिती

By Noukarisamachar

Published on:

चारित्र्य दाखला कसा काढायचा? घ्या जाणून संपूर्ण माहिती

 

Character Certificate भरतीसाठी तसेच विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आजही अनेकांना याची जाणीव नसल्याने त्यांना नाहक त्रास होत आहे. निमशासकीय, खाजगी संस्था इत्यादींमध्ये नोकरीसाठी आचार आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत आवश्यक आहे.

Character Certificate आधी प्रक्रिया काय होती?

चारित्र्य प्रमाणपत्रासाठी आयुक्तालयात अर्ज करावा लागेल आणि अर्जाच्या फी रक्कमेचा डीडी सादर करावा लागत असे. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात कागदपत्रे पाठवून अर्जदाराची विशेष शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत असे. त्यानंतर पोस्ट आयुक्तालयात यायची आणि त्यानंतर संबंधित नागरिकाला प्रमाणपत्र मिळायचे. परंतु आता नोकरी आणि इतर विविध नोकऱ्यांसाठी पोलिसांना आवश्यक असलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध आहे.

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रामुख्याने ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि तुम्हाला चारित्र्य पडताळणी कुठे सबमिट करावी लागेल. चारित्र्य पडताळणी विनंती पत्र हे आवश्यक असलेले मुख्य दस्तऐवज आहे. खाली दिलेल्या कागदपत्रांची यादी जोडा

ओळखीचा पुरावा:-
१) आधार कार्ड.
२) ड्रायव्हिंग लायसन्स.
३) मतदान कार्ड.
४) पॅन कार्ड.
५) विद्यार्थ्यांचे ओळखपत्र
६) पासपोर्ट. आणि इतर.
ओळखीच्या पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे. Character Certificate

पत्त्याचा पुरावा:-
१) शिधापत्रिका.
२) लाईट बिल
३) फोन बिल
४) भाडे करार
५) पासपोर्ट.
६) आधार कार्ड.
पत्त्याच्या पुराव्यासाठी वरील दिलेल्या कागदपत्रापैकी कोणतेही एक  कागदपत्र जोडणे बंधनकारक आहे.

वयाचे पुरावे:-

१) जन्म प्रमाणपत्र.
२) मंडळाचे प्रमाणपत्र.
३) शाळा सोडल्याचा दाखला.
वयाच्या पुराव्यासाठी वरीलपैकी  कोणतेही एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

इतर पेपर्स:-

१) अर्जदाराचे छायाचित्र.
२) अर्जदाराची स्वाक्षरी.
३) कंपनीचे पत्र.
४) पोलीस अधीक्षकांकडे अर्ज.

DMER Recruitment 2023 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती : मुंबई येथे 5182+ जागांसाठी नवीन मेगाभरती सुरु

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कसे मंजूर करावे?

Character Certificate चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज तुमच्या स्थानिक पोलिस ठाण्यात जातो. त्यावेळी अर्जदाराने भरलेला फॉर्म आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे पडताळली जातात. आणि सदर व्यक्तीविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवला गेला आहे की नाही याचीही पडताळणी केली जाते, त्यानंतर सदर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाकडे जातो. त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाते आणि सर्वकाही बरोबर असल्यास तुमचा अर्ज मंजूर केला जातो आणि तुम्हाला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळते.

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कधी आणि का मिळत नाही?

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना अर्जदाराने अर्जात योग्य माहिती भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना काही चूक झाली किंवा चुकीची कागदपत्रे राहिली तर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

यापूर्वी चारित्र्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पोलिसांच्या तीन ते चार वेबसाइटवरून फॉर्म भरून त्याची प्रिंट काढावी लागत होती. त्यानंतर विशेष शाखेत जाऊन विहित तारखेला फॉर्म व कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी अहवालासाठी ३ ते ४ दिवस संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहावे लागत होते. नागरिकांना ३० दिवसांनी चारित्र्य प्रमाणपत्र मिळत होते. परंतु पोलिसांच्या विशेष शाखेने www.pcsmahaonline.gov.in आणि www.aaplesarkar.mahaonline.gov.in या नवीन वेबसाइट सुरू केल्या आहेत.

या साईट वर ऑनलाईन अर्ज करून तुम्ही चारित्र्य दाखला घेऊ शकता. पडाळणीसाठी संबंधित पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले जाते. डिजिटल स्वाक्षरी झाल्यावर तुम्हाला मेसेज द्वारे कळवण्यात येते.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न??

1. सरकारी नोकरीसाठी चरित्र ची गरज असते का?? 

उत्तर:- सर्वच सरकारी नोकरीसाठी चरित्र प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे असते काही वेळा हे उमेदवारांना करावे लागते तर काही वेळा आहे ज्या विभागात नोकरी करत आहे त्या विभागामार्फत केली जाते.

2. चारित्र्य प्रमाणपत्रासाठी किती अर्ज शुल्क आकारले जाते. 

उत्तर:- महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबसाईट द्वारे 100 ते 200 रुपये पर्यंतची शुल्क आकारले जाते.

3. चारित्र्य प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिले जाते.??

उत्तर:- ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला एसएमएस द्वारे कळले जाते आणि उमेदवार आपल्या प्रोफाइल मधून पीडीएफ स्वरूपात हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतो.

4. जर एखादा गुन्हा नोंद झाला असेल तर काय करावे??

उत्तर:- जर उमेदवारावर एखादा फौजदारी किंवा दिवाळी गुन्हा दाखल असेल तर चारित्र्य प्रमाणपत्रासाठी उमेदवाराला न्यायालयात जावे लागते.

5. चारित्र्य पडताळणी ग्रामीण स्तरावर कोण करते?? 

उत्तर:- गावच्या पोलीस पाटलाकडून ग्रामीण स्तरावरून उमेदवाराची वैयक्तिक आणि खाजगी माहिती विचारली जाते आणि त्याच्या चरित्राचे पडताळणी केली जाते.

Pm Kisan New Website नवीन वेबसाईट सुरू आता घरबसल्या करा Kyc, चुकामध्ये सुधारणा, खाते नंबर जोडणे.. 

EPF 95 Pension scheme :-  EPF वाढीव पेन्शन साठी अर्ज केलाय पण ;  फायदे आणि तोटे घ्या सविस्तर जाणून..!!

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas